कणकवली /-
जिल्हयातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाद्वारे खारेपाटण महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती रॅली ३८ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांच्या सहभागातून यशस्वीरित्या संपन्न.
या रॅलीचे उद्घाटन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे व मा. श्री. ॠषिकेश उर्फ दादा जाधव यांनी केले. या प्रसंगी खारेपाटण पंचक्रोशीत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री. विजय देसाई, व श्री. संदेश धुमाळे, तसेच श्री. रफिक नाईक, श्री. सुकांत वरूणकर, श्री. मंगेश गुरव, श्री. निशिकांत शिंदे, श्री. प्राजल कुबल, श्री. सुधीर कुबल, श्री. गजानन राऊत, श्री. अक्षय चिके, श्री. संतोष रोडी, श्री. तुषार कोळसुलकर, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक तथा खारेपाटण महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी श्री. वसीम सय्यद, राष्ट्रीय सेवा योजना विभाग सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रकाश शिंदे, प्रा. गजानन व्हंकळी आदी मान्यवर उपस्थित होते. जय भवानी – जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज – की जय, छत्रपती शिवाजी महाराजांचा – विजय असो अशा विविध घोषणांच्या गजरात खारेपाटण बसस्थानकपासून या रॅलीची सुरुवात होऊन ही रॅली खारेपाटण बाजारपेठ, घोडेपात्र, या मार्गावरून दुर्गादेवी मंदिराच्या परिसरात संपन्न झाली. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील ३८ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांसह, प्राध्यापक तसेच खारेपाटण येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम ५ शिवकन्यांच्या हस्ते खारेपाटण उपबसस्थानक येथे शिवप्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज हे परिस होते असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांनी केले.
खारेपाटण किल्ल्यातील दुर्गादेवी मंदिरात श्रीफळ अर्पण करून बुरुजावर भगवे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहन उपरांत खारेपाटण किल्ला व दुर्गादेवी मंदिर परिसर राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी स्वच्छ केले.
सदर कार्यक्रमावेळी खारेपाटण किल्ल्याच्या संवर्धनासाठी सगळ्यांनी निधी संकलन करण्याची व येत्या काळात लवकरात लवकर किल्ल्याचे पुनर्जीवन करण्याची शपथ शिवजयंती उत्सव मंडळ कार्यकर्त्याद्वारे घेण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थी प्रतिनिधी कु. तुषार जाधव, कु. अरुणा कोकाटे, कु. श्रेयश गाडे, कु. हर्षद जाधव, कु. नवीनता राऊत, कु. अनिकेत पाष्टे, कु. सुदर्शन रांबाडे, कु. ॠतिका धावडे आदी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सक्रीय सहभाग दर्शविला.