भाजपचे पदाधिकारी राजेश पडते यांचे माजी खासदार निलेश राणे यांनी केले सांत्वन..

भाजपचे पदाधिकारी राजेश पडते यांचे माजी खासदार निलेश राणे यांनी केले सांत्वन..

कुडाळ /-

भाजपचे पदाधिकारी राजेश पडते यांच्या मातोश्रीचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी शनिवारी त्यांच्या कुडाळ पडतेवाडी येथील निवासस्थानी भेट देऊन पडते परिवाराचे सांत्वन केले.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष विनायक राणे, नगराध्यक्ष ओंकार तेली, विजय कांबळी, आनंद शिरवलकर, सुनील बांदेकर, दीपलक्ष्मी पडते, रेखा काणेकर, श्रीपाद तवटे, रूपेश कानडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..