वायंगणी, आंबडोस, कांदळगाव येथील विविध विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमीपूजने

वायंगणी, आंबडोस, कांदळगाव येथील विविध विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमीपूजने

कुडाळ /-

शिवजयंतीच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील वायंगणी, आंबडोस, कांदळगाव येथील विविध विकासकामांची भूमीपूजने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये वायंगणी येथील ठाणेश्वर शाळा ते समुद्र किनारपट्टीवर जाणारा रस्ता, आंबडोस येथील श्री. देव रवळनाथ मंदिर कंपाउंड वॉल बांधणे, व आंबडोस महात्मा फुले नगर ते कदमवाडी मार्गे जाणार रस्ता, त्याचबरोबर कांदळगाव येथील राणेवाडी रस्ता, व कांदळगाव कदमवाडी स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

हि विकास कामे मंजूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. त्यांनी ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन विकास कामांसाठी निधी मंजूर केला असून या कामांना सुरुवात झाली आहे. याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आ. वैभव नाईक यांचे आभार मानले.
यावेळी वायंगणी येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा बँक संचालक व्हीकटर डान्टस, विभागप्रमुख उदय दुखंडे, सरपंच संजना रेडकर, शाखा प्रमुख दिनेश साळकर ,नारायण सावंत, ग्रा. प. सदस्य सुनील माळकर, दामोदर वायंगणकर निवृत्ती आडाळकर , सदानंद राणे, सचिन रेडकर, प्रकाश पेडणेकर, रामदास सावंत, अभय पेडणेकर , संतोष सावंत, रामदास प्रभू, नरेश सावंत, विकास परब,
आंबडोस येथे सरपंच राधा वरवडेकर, माजी सरपंच दिलीप परब, दिगंबर नके, विशाल धुरी, ओमप्रकश चव्हाण, रमेश परब, चंद्रकांत परब, एकनाथ नाईक, अमित राणे, निवृत्ती परब, राजन परब, विष्णू परब, आशिष परब, भाऊ चव्हाण,
कांदळगाव येथे उपविभाप्रमुख अमोल वस्त, शाखा प्रमुख जीवन कांदळगावकर, दीपक परुळेकर, अमोल परब, विकास आचरेकर, रणजित परब, प्रवीण परुळेकर, प्रदीप राणे इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..