कुडाळ नगरपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर..

कुडाळ नगरपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर..

कुडाळ /-

राज्यातील १ नगरपरीषद व ४ नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणकीचा आरक्षण स़ोडत कार्यक्रम जाहीर झाला.असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतची आरक्षण सोडत कार्यक्रम आज बुधवार दिनांक १० फेब्रुवारी २०२१ निवडणूक अधिकारी श्रीमती वैशाली राजमाने आणि कुडाळ नगरपंचायत चे मुख्याधिकारी श्री.नितीन गाढवे यांच्या उपस्थितीत आज पार पडला.कुडाळ नगरपंचायतीच्या विद्यमान सदस्यांची मुदत ११ मे २०२१ मध्ये संपणार आहे.त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक आरक्षण व प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमात कु.युक्ता कुडाळकर आणि गायत्री मडव या छोट्या मुलांनी चिट्टी काढून सोडत काढली,त्यानुसार कुडाळ नगरपंचायत मधील आरक्षण हे पुढील प्रमाणे आहेत.प्रभाग क्रमांक १-कविलकाटे,( ओबीसी महिला) २- भैरववाडी (ओबीसी महिला.) ३- लक्ष्मीवाडी-( ओबीसी पुरुष ) ४- कुडाळ बाजारपेठ – (सर्वसाधारण महिला.) ५- कुडाळेश्वरवाडी (-सर्वसाधारण ) ६- गांधी चौक -(सर्वसाधारण महिला ) ७- आंबेडकर नगर -(नागरिकांचा मागास प्रवर्ग ), ८- मज्जीत मोहल्ला तुपटवाडी -(ओबीसी महिला ) ९- नाबरवाडी (-सर्वसाधारण ) १० – केळबाईवाडी- (ओबीसी महिला )११- वाघ सावंत टेंम्ब गणेशनगर,(सर्वसाधारण, अनुसूचित जाती.) १२- हिंदू कॉलनी – (-सर्वसाधारण महिला), १३-श्रीरामवाडी (सर्वसाधारण) १४-अभिनवनगर -( सर्वसाधारण),१५- कुंभारवाडी – (सर्वसाधारण महिला ) १६- MIDC – (सर्वसाधारण ) १७- सांगिरडेवाडी (ओबीसी महिला.)

अभिप्राय द्या..