युवासिंधू फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रम..

युवासिंधू फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रम..

सावंतवाडी /-

युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून ओरोस येथील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन कोविड १९ च्या काळात मोलाचं योगदान देणाऱ्या येथील साफसफाई कामगारांच्या कार्याचा गौरव करत त्यांना महिलांना साडी, पुरुषांना शर्टपीस, तुळशी वृंदावन देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. पाटील, कलंबिस्तकर, ॲड. भक्तराज राऊळ यांच्या हस्ते गौरव समारंभ संपन्न झाला. यावेळी साफसफाई कामगार, रूग्णालयाचे कर्मचारी वृंद आणि युवासिंधु फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.तसेच अणाव येथील आनंदाश्रयाला भेट देऊन तेथील आजी-आजोबांसोबत
युवासिंधु फाऊंडेशनच्या सदस्या कु प्रणिता कोटकर चा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आनंदाश्रयाला आवश्यक असे डायपर, साड्या अशा भेटवस्तू
देण्यात आल्या.सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे
अतिरिक्त शल्यचिकित्सक
डॉ. पाटील व आनंदाश्रयाचे गोविंद परब यांनी वेळोवेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युवासिंधु फाऊंडेशनच्या सर्वच युवा सदस्यांचे कौतुक केले.यावेळी
सागर नाणोसकर, ओंकार सावंत, नंदिनी धानजी, साईश सावंत, सौरभ पडते, सोनु गवस, विनय वाडकर, सोमेश्वर सावंत, मुन्ना आजगावकर आदी युवासिंधु फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.यावेळी समाजकार्याचा वसा युवासिंधु फाउंडेशनच्या माध्यमातून असाच वर्षानुवर्षे आम्ही चालवू, असे विचार प्रणिता कोटकर हिने व्यक्त केले.त्यानंतर त्यांनी युवासिंधु फाऊंडेशनच्या वतिने भक्तराज राऊळ, पुष्पलता माजगावकर यांचेही आभार मानले.

अभिप्राय द्या..