तुळस येथे दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन..

तुळस येथे दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन..

वेंगुर्ला /-

वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग, तुळस यांच्यातर्फे अश्वमेध अंतर्गत १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत श्री देव वेताळ मंदिर तुळसच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात १० रोजी खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली यांचा ‘चौरंगीनाथ‘, ११ रोजी सुधीर कलिगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा ‘देवदत्त गितांजली‘, १२ रोजी नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्य मंडळ मोचेमाड यांचा ‘आई कुमारी‘, १३ रोजी पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा ‘त्रिनेत्रधारी गणेश‘ आदी नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. तर १४ रोजी सायं.७ वा. इंद्रधनु कलामंच दाभोली यांची दशावतार कलेवर भाष्य करणारी सामाजिक, विनोदी एकांकिका, निमंत्रित गृपचे विविध नाट्याविष्कार व निमंत्रिक एकपात्री अभिनय, सप्तरंग कलामंच होडावडे यांची धमाल मालवणी एकांकिका ‘गेले भजनाक, पोहचले लग्नाक‘ आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सचिन परुळकर व सचिव गुरुदास तिरोडकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..