साटेली-भेडशीत तब्बल तीन तास रस्ता रोको आंदोलन..

साटेली-भेडशीत तब्बल तीन तास रस्ता रोको आंदोलन..

दोडामार्ग /-

खड्ड्यातील रस्ते सुस्थितीत व्हावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस, संदेश वरक, पराशर सावंत व ग्रामस्थ यांनी दोडामार्ग बेळगांव राजमार्ग रोखून धरत रस्ता रोको केला मात्र दोन तासांनी सार्वजनिक बांधकामने याची दखल घेत उप अभियंता चव्हाण यांनी भेट देत सदर रस्त्यांसाठी निधी मंजूर नसल्याने आपण कोणतेही आश्वासन देऊ शकत नसल्याने आंदोलक आपल्या निर्णयावर ठाम असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवा त्यांच्याशी आम्ही बोलतो असे सांगत रास्ता रोखून होते. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांनी मध्यस्ती केल्यानंतर असिस्टंट इंजिनियर श्री माने यांच्याशी चर्चा करूनही त्यांनी या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध नसून नवीन निधी आल्या नंतर रस्ता होईल असे सांगताच आंदोलक आक्रमक होत सदर आपणच याबाबत पत्र द्या त्यानंतर आंदोलन मागे घेतो असे सांगितले, मात्र निधीच उपलब्ध नसल्याने तालुक्यातील रस्त्यांचे भवितव्य अंधकारमय आहे, तसेच तीन तास चाललेल्या या आंदोलनाला एकही लोकप्रतिनिधींनी भेट न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र बांधकामची सहकार्याची भूमिका नसल्याने रास्ता रोकोत अनेक वाहने तसेच शाळेतील मुले अडकल्याने दोडामार्ग पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांनी सहकार्याची भूमिका घ्या अन्यथा आपणावर कारवाई करावी लागेल अशी विनंती केल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या घालण्याच्या निर्णयाने आंदोलक पोलीस व्हॅन मधून सार्वजनिक बांधकाम कडे रवाना झाले.

अभिप्राय द्या..