माणगाव शिवसेना विभाग संघटकपदी कौशल जोशी यांची नियुक्ती..

माणगाव शिवसेना विभाग संघटकपदी कौशल जोशी यांची नियुक्ती..

कुडाळ /-

शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल दत्ताराम जोशी यांची माणगाव शिवसेना विभाग संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार वैभव नाईक यांनी आज कणकवली विजय भवन येथे नियुक्ती पत्र देऊन पक्ष संघटना वाढीसाठी जोमाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कौशल जोशी यांनी खा.विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आ.वैभव नाईक , यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी जि.प.सदस्य राजू कविटकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..