दोडामार्ग /-
संपूर्ण महाराष्ट्रात 250 पेक्षा जास्त शाखा असलेल्या “इ स्टोअर इंडिया” या सुपर मार्केटची सिंधुदुर्गातील १० वी शाखा दोडामार्ग येथील दळवी कॉम्प्लेक्स मध्ये सुरू झाली, याचा छानदार उदघाटन सोहळा अनिल जाधव, नेशनल प्रमोटर, शैलेश पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व सुरेश दळवी जिल्हा बॅंक उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सर्वात स्वस्त सुपर मार्केट अशी ख्याती असलेल्या या सुपर मार्केटच्या उदघाटन प्रसंगी श्री जाधव यांनी स्टोअरचे वैशिष्ठ सांगताना हा एक ब्रॅण्ड असून देशातील नामांकित कंपन्यांबरोबर आमचे टायप असल्याने वस्तू स्वस्त देणे परवडते असे सांगितले तर वैद्यकीय क्षेत्रातील आयुर्वेदिक औषधी ही या व्यवसायाचा पाया असल्याचे ते म्हणाले, या स्वस्त सुपर मार्केट मध्ये खरेदीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बॅंक उपाध्यक्ष सुरेश दळवी यांनी केले. सुपर मार्केट संजय कल्याणकर यांच्या व्यवस्थापनाखाली चालणार असून मनोज माळकर व फटी गवस यांचे सहकार्य त्यांना लाभणार आहे, उदघाटनंतर अनेक ग्राहकांनी खरेदीचा आनंद लुटला.व्यवसाय व लाईफ टाईम कम्पानिंग साठी मनोज माळकर 9324192492 यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.