वेंगुर्ला /-
वेंगुर्ला येथे गृहिता फाऊंडेशन ही महिला सहकारी संस्था कार्यरत असून या संस्थेच्या मराठे महिला गृहउद्योग या फळ व अन्न प्रक्रिया युनिट च्या प्रॉडक्ट चे लॉंचिंग माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे व जिजाऊ महिला संस्थेच्या अध्यक्षा निलमताई राणे यांच्या हस्ते तसेच विकास सावंत व विक्रांत सावंत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.महिला बचत गटाच्या माध्यमातून सदर संस्थेच्या पुढील प्रक्रिया व उत्पादन यावर काम करण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या वतीने महिला बचतगट स्थापन करून रोजगाराच्या शासनाच्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रातिनिधिक स्वरुपात या उत्पादनांचे तिन्ही ठिकाणी उद्घाटन करण्यात आले, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा गौरी मराठे यांनी दिली. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. सौ. पूजा कर्पे, सचिव रश्मी गावडे, खजिनदार राधिका लोणे, सदस्य श्रुती देसाई, अनुराधा वेरणेकर , प्रगती चव्हाण, अपूर्वा दामले, मुग्धा वैद्य, सोनाली कुलकर्णी, सायली कोचरेकर आदी सदस्य उपस्थित होते.