बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.प्रदिप होडावडेकर सेवानिवृत्त

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.प्रदिप होडावडेकर सेवानिवृत्त

वेंगुर्ला /-

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.प्रदिप होडावडेकर आपल्या नियत वयोमानानुसार ३१ जानेवारी २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्रा.होडावडेकर यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी त्यांच्या सेवानिवृत्तीपर प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी प्रा.नंदगिरीकर,प्रा.चमणकर, प्रा.डॉ.पाटोळे, प्रा.शितोळे, प्रा.डॉ.गायकवाड,प्रा.डॉ.मुजुमदार, प्रा.नवत्रे,प्रा.डॉ.आनंद बांदेकर, प्रा.वामन गावडे,प्रा.देशपांडे, अशोक सावळे यांनी प्रा.होडावडेकर यांनी महाविद्यालयाच्या कामकाजात दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोदगार काढले.या कार्यक्रमात प्रा.होडावडेकर यांनी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संस्थेचे सचिव प्रा.जयकुमार देसाई,पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई,प्रशासन अधिकारी प्रा.डॉ. मंजिरी मोरे देसाई,यांनी आपल्या संस्थेत सेवा करण्याची संधी दिली,याबद्दल ऋण व्यक्त केले आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.यावेळी प्रा.देऊलकर यांनी प्रा.होडावडेकर यांनी महाविद्यालयीन कामकाज तसेच सांस्कृतिक समितीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.वामन गावडे यांनी व आभार प्रा.देविदास आरोलकर यांनी मानले.

अभिप्राय द्या..