रेडी बंदर परिसरात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर वर कारवाई

रेडी बंदर परिसरात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर वर कारवाई

वेंगुर्ला -/-

रेडी बंदर समोरील समुद्रात अनधिकृत मच्छीमारी करत असलेल्या गोवा राज्यातील ट्रॉलरवर वेंगुर्ले सागरीसुरक्षा विभागाने कारवाई केली. यामध्ये सापडलेल्या मासळीचे लिलाव करून पुढील कारवाईसाठी हा ट्रॉलर वेंगुर्ले बंदर समुद्रात अवरुद्ध करण्यात आला असल्याची माहिती मत्स्य विभाग परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी दिली. ३१ जानेवारी रोजी ३.३० च्या सुमारास सागरीसुरक्षा विभागाचे सुरक्षा रक्षक राजेश कुबल, हर्षद टाककर व पोलीस पिळगावकर हे गस्तीवर असताना वेंगुर्ले रेडी बंदरासमोरील १८ वाव समुद्रात गोवा राज्यातील रॉयल सी नामक ट्रॉलर्स मच्छीमारी करत असताना आढळून आला. दरम्यान सदर ट्रॉलर पुढील कारवाईसाठी वेंगुर्ले बंदर येथे आणला असता यात मिळालेल्या मासळीचे ३० हजार रुपयांना लिलाव करण्यात आले व पुढील कारवाईसाठी ट्रॉलर वेंगुर्ले बंदर येथे ठेवण्यात आला असल्याची व वेंगुर्ले तहसीलदार यांचे न्यायालयात कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी दिली. यावेळी पो.कॉं. अमर कांडर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..