यशवर्धन जयराज राणे(अध्यक्ष : युवा फोरम , भारत संघटना) यांची *Unicef(UNO) संयुक्त राष्ट्रसंघ च्या “yuWaah ! “कार्यक्रमासाठी निवड

यशवर्धन जयराज राणे(अध्यक्ष : युवा फोरम , भारत संघटना) यांची *Unicef(UNO) संयुक्त राष्ट्रसंघ च्या “yuWaah ! “कार्यक्रमासाठी निवड

कुडाळ /-

नीती आयोग व *संयुक्तराष्ट्र बालनिधी (UNICEF)* यांच्या सहयोगाने 2018 मध्ये भारतामध्ये “yuWaah ! ” या कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमासाठी भारतातील सक्षम युवकांची निवड करण्यात येते.तरुणांना अधिक वाव देऊन व योग्य मार्गदर्शन करून नव्या भारताचे नेतृत्त्व करण्यासाठी त्यांना घडवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.युवा फोरम , भारत संगटनेचे अध्यक्ष यशवर्धन जयराज राणे यांची या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.सदर कार्यक्रमासाठी देशभरातून 1 लाख 13 हजार अर्ज आले होते, यातील फक्त 28 जणांची निवड करण्यात आली आहे.या बाबत सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.अधिकाधिक तरुणांनी पुढे येऊन कार्य करावेअसेंच त्यांच्या युवा फोरम संघटनेचेही उद्दिष्ट आहे व त्या द्वारे त्यांचे कार्य सुरू असते.

अभिप्राय द्या..