कुडाळ शहरातील पानबाजार आणि मज्जिद मोहल्ला येथील कार्यकर्त्यांचा संतोष शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ शहरातील पानबाजार आणि मज्जिद मोहल्ला येथील कार्यकर्त्यांचा संतोष शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेचे कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली
पानबाजार,मज्जिद मोहल्ला येथील कार्यकर्त्यांनी आज आमदार वैभव नाईक,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश प्रवेश केला.हे सर्व कुडाळ शहरातील सर्व कार्यकर्ते शिवसेना कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट यांच्या संपर्कात बरेच दिवस होते.आज यांनी शिवसेनेत प्रवेश केला.प्रवेश कर्ते पुढील प्रमाणे आहेत,,तशीर नदात,प्रथमेश माने ,सौरभ माने ,संकेत पिसे ,साहिल गोलंदाज,अब्दुल नाईक ,शयबर शेख ,साद बागबान ,सलमान चौकेकर ,शाहित कार्नेकर ,नजीर कार्नेकर ,नावेद कार्नेकर ,अस्लम शेख ,वसीम शेख ,ताबिश नाईक,मैताब शहा ,अखतर गोलनदाज ,फिरोज शेख ,मन्सूर शेख अन्य कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केला.

या प्रवेशावेळी आमदार वैभव नाईक मार्गदर्शन करताना म्हणाले, शिवसेनेत प्रवेश केलेल्या युवकांचा योग्य सन्मान केला जाईल. तसेच तुमचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आम्ही प्रमाणिक प्रयत्न केला जाईल.
यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी देखील मार्गदर्शन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, शहराध्यक्ष संतोष शिरसाट, जि. प. सदस्य नागेंद्र परब, रुपेश पावसकर, संजय भोगटे, नगरसेवक सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, बाळा पावसकर,राजू जांभेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..