जिल्हावासीयांच्या टोलसुट बद्दलची अधिकृत भूमिका जाहीर करा.;जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

जिल्हावासीयांच्या टोलसुट बद्दलची अधिकृत भूमिका जाहीर करा.;जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

जिल्हा वासियांकडुन टोल वसुली केल्यास मनसेचा विरोध..

सिंधुदुर्ग /-

जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि पर्यटन जिल्ह्याच्या भविष्यातील विकासात महत्त्वाची भूमिका ठरणाऱ्या मुंबई महामार्ग MH 66 काम अंतिम टप्प्यात आहे. गोवा राज्याच्या सिमे पासून खारेपाटण पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या हायवेवर जिल्ह्यात दोन टोल नाके उभारण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या नियमानुसार 80 टक्के काम पूर्ण झाल्यावर टोल आकारणी सुरू होऊ शकते या अनुषंगाने या हायवेचे काम अंतिम टप्प्यात आहे. तरी टोल विषयी शासनाचे धोरण जाहीर करण्यात यावे, सिंधुदुर्ग वासियांना या टोल वसुली मध्ये सूट मिळावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आग्रही मागणी आहे .शासनाने याबाबत निश्चित धोरण जाहीर करावे जिल्हावासीयांना टोल सक्ती केल्यास विविध व्यावसायिक स्थानिक नागरिक व मनसे टोल विरोधात जनआंदोलन उभारेल याची नोंद घ्यावी. व याबाबत धोरण प्रसिद्ध करावे यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, तालुका सचिव विठ्ठल गावडे, उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ, रुपेश पांगम, सुनील सोनार, अमित घाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते

अभिप्राय द्या..