आचरा /-
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर आचरा येथील यशराज प्रेरणा गृप तर्फे हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे स्मारक येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी स्मारकाचे आवार स्वच्छ धुवून कचरा गोळा करून परीसर स्वच्छ करण्यात आला.
या मोहिमेत परीसरात टाकण्यात आलेल्या काचीच्या, प्लॅस्टीकच्या बाटल्या उचलून एकत्र करण्यात आल्या.आवारातील रान काढून परीसर स्वच्छ करण्यात आला.तसेच ध्वजस्तंभाला रंगरंगोटी करण्यात आली. या वेळी यशराज प्रेरणा गृप चे मंदार सरजोशी, रोहीत भिरवंडेकर,राहूल भिरवंडेकर,सुयोग नाटेकर,प्रणित शेलटकर,आचरा पोलीस पाटील जगन्नाथ जोशी,व्यायाम शाळा प्रशिक्षक चेतन जामसंडेकर, रोहीत बोअरवेलचे कर्मचारी पवन कुमार,भुवन नेताम, राकेश नेताम,धनसिंग मंदावली आदी सहभागी झाले होते.त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.