आचरा /-
आचरा वरची वाडी येथील बालगोपाल मंडळाची नविन कार्यकारिणी निवड गुरुवारी करण्यात आली. या मंडळाच्या
अध्यक्ष पदी विलास दत्ताराम आचरेकर तर उपाध्यक्ष पदी किशोर तुळशीदास आचरेकर यांची निवड सर्वानूमते करण्यात आली.या मंडळाच्या सचिव पदी गोविंद शिवराम शेट्ये,सहसचिव महेंद्र हरिशचंद्र आचरेकर आचरेकर,खजिनदार पंकज वामन आचरेकर यांची निवड करण्यात आली.या साठी निवडणूक अधिकारी म्हणून वैभव शाली पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत सांबारी यांनी काम पाहिले.यावेळी विद्यमान अध्यक्ष वामन आचरेकर,बबन शेट्ये, रामदास आचरेकर, महेंद्र आचरेकर, मारूती आचरेकर यांच्या सह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.