बाव गाळववाडी येथील स्ट्रीट लाईटचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन..

बाव गाळववाडी येथील स्ट्रीट लाईटचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील बाव गाळववाडी येथील स्ट्रीट लाईटचे उदघाटन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या मागणीवरून आ. वैभव नाईक यांनी हि स्ट्रीट लाईट मंजूर केली आहे. आमदार स्थानिक विकास निधीतून ३ लाखाचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला. स्ट्रीट लाईट बसविल्याबाबत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी पावशी विभाग प्रमुख दीपक आंगणे, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, रुपेश पावसकर, नितीन सावंत, अनुप चेंदवणकर, प्रशांत परब, विश्राम परब, सुदर्शन परब, रामदास परब, दीपक राऊत, संदेश सामंत, मंगेश मांजरेकर, हरिश्चन्द्र परब, राजन आसोलकर,सतीश मांजरेकर, मनोहर टोपले आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..