२०२१ओरिगामी घरांच्या आकृत्यांपासून बनला ध्वज!सृजनशील दृष्टीतुन कोरोना योध्याना अनोखी मानवंदना..

२०२१ओरिगामी घरांच्या आकृत्यांपासून बनला ध्वज!सृजनशील दृष्टीतुन कोरोना योध्याना अनोखी मानवंदना..

मसुरे /-

गतवर्षीच्या मार्च महिन्या नंतर यावर्षीच्या प्रजासत्ताक दिना पर्यंत अवघा देश कोरोनाने थांबला होता.
कोरोनाने आपल्याला जखडून ठेवताना आपल्या घरात आम्ही सर्व सुरक्षित बसून होतो कारण ‘ते’ आमच्यासाठी लढत होते.हे देश सेवक आहेत सर्व सफाई कामगार, पोलीस, अत्यावश्यक सेवा कर्मचारी, डाॅक्टर आणि कोरोना असो किंवा नसो अहोरात्र देशरूपी घराच्या सीमा सुरक्षित ठेवणारे आपले सैनिक बांधव. यांच्या प्रति कृतज्ञता व त्यांच्या कार्यास मानवंदना देण्यासाठी घरा-घरातून लिखित संदेश असलेल्या कागदाच्या ओरीगामी कलाकृती एकत्रीत करून १८ x १० फुट ओरीगामी ध्वज क्रॉफर्ड मार्केट मुंबई येथे अशोक शॉपिंग सेंटरचे टेरेस येथे करण्यात आला आहे.मूळ संकल्पना आहे ती श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट यांची आणि उजागर संस्था हा कार्यक्रम आयोजित करणार आहे.

बालश्री पुरस्कार प्राप्त कला दिग्दर्शक सुमित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून विशेष म्हणजे १५ दिव्यांग बांधवांनी हा कागदी ध्वज साकार केला आहे.
घराघरातून येणारे कृतज्ञता पुर्वक संदेश हे याच कागदी ध्वजातून कोरोना योध्दे व सैनिक बांधव यांच्या पर्यंत पोस्टाद्वारे पाठवण्यात येणार आहेत.
२०२१ ओरिगामी घरांच्या आकृत्यांपासून बनवलेला हा कागदी ओरीगामी ध्वज हस्त निर्मित आहे. या कार्यक्रमासाठी त्यास धीर जैन यांचे सहकार्य लाभले आहे. दिव्यांग बांधवानी साकारलेल्या या ध्वजाला सुमित पाटील यांच्या दिग्दर्शनाने चार चांद लावले आहेत.

अभिप्राय द्या..