कुडाळ /-

आयु क्योअरच्या ई-स्टोअर इंडिया सुपर बाजाराचा शुभारंभ कुडाळ तालुक्यातील पणदुर येथे वेदीक आयुक्योरचे नॅशनल प्रमोटर अनिल जाधव यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब
पणदुर सरपंच दादा साईल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थितीत करण्यात आला.या शॉपीमुळे सर्वांना सवलतीच्या दरात जीवनावश्यक साहित्य उपलब्ध व्हावे या करीता कंपनीने या ई-स्टोअर इंडिया सर्वांत स्वस्त सुपर बाजाराची निर्मिती केली आहे.आहेत तसेच सवलतीच्या दरात जीवनावश्यक साहित्य मिळणार आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा.पणदुर येथे वेदीक आयुक्योरचे नॅशनल प्रमोटर अनिल जाधव यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.कंपनीने महत्व पटवून दिले.या वेळी वेदीक आयुक्योरच्या साऊथ इंडिया प्रमोटर संजना परापंजे उपस्थित होत्या.या शॉपीचा लाभ सर्व सामान्य माणसाला मिळावा असे आव्हान संजना परापंजे यांनी केले, वेदीक आयुक्योरचे मंदिर निर्माण करण्यासाठी खुप जणांनी परिश्रम घेतले आहे.आयुरवेदीक शिबिराचा लाभ घ्या, निरोगी रहा असे सांगितले.

जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी सांगितले की ही आयुरक्योर कंपनीने आरोग्य,शेती आणि ग्रोसरीच्या माध्यमातून लोकांना निरोगी ठेवणं हे काम सातत्याने केलं आहे.आणि युवकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.दादा साईल यांनी सांगितले कीं या वेदीक आयुक्योर कंपनीने सर्वांना रोजगार देण्याचे कार्य केले आहे.हे देखील आत्म निर्भर बनवण्यासाठी एक चांगलं काम आज इस्टोर इंडिया करत आहे.लोकडाऊच्या काळात देखील या कंपनीने सामजिक बांधिलकी जपान चांगले समाज कार्य केले आहे.असे डायनॅमिक लीडर किरण कदम यांनी सांगितले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन किरण कदम यांनी नियोजन बद्ध केले.

यावेळी वेदिक आयुर क्युअर चे नॅशनल प्रमोटर श्री अनिल जाधव, साउथ इंडिया प्रमोटर सौ संजना परांजपे, महाराष्ट्र गोवा प्रमोटर श्री शैलेंद्र पेडणेकर, जि.प. सदस्य श्री नागेंद्र परब, पणदुर गावचे सरपंच दादा साईल.कंपनीचे ग्रेट सिंधुदुर्ग लीडर निल फर्नांडिस ,स्वप्नील कदम अन्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.किरण कदम तर आभार प्रदर्शन श्री. आबा तळेकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी सचिन सावंत, रौनक पटेल, स्वप्निल गावडे, विजय कुडव, संदिप आरोंदेकर, राजन पाताडे हे उपस्थित होते.मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अगदी दिमाखात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page