पदमश्री पुरस्कार प्राप्त श्री.परशुराम गंगावणे यांचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार

पदमश्री पुरस्कार प्राप्त श्री.परशुराम गंगावणे यांचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार

कुडाळ /-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात नाहिसी झालेल्या आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपारीक लोककला जतन व प्रसार करण्याचे कार्य कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील परशुराम विश्राम गंगावणे हे गेले ४५ वर्षे हे करीत आहे. कठिण परिस्थितीमध्ये त्यांनी ही लोककला जपुन ठेवली.

कळसूत्री बाहुल्यांचे खेळ दाखवणारे पिंगुळी गावचे सुपुत्र श्री.परशुराम गंगावणे यांना महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आज त्यांच्या पिंगुळी येथील निवासस्थानी भेट देऊन श्री.गंगावणे यांचे शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन केले.

यावेळी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रा.सचिन पाटकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष सर्वेश पावस्कर, सनी मोरे, दिनार खानविलकर, केदार भोसले, अक्षय कोंडुरकर आदी. उपस्थित होते.

अभिप्राय द्या..