मालवण येथे दांडी बीच समुद्राच्या तीन किमी आतमध्ये रंगाच्या साह्याने साकारला तिरंगा…

मालवण /-

लोणंदचे सुपुत्र एव्हरेस्टवीर व अनेक रेकॉर्ड पदक्रांत केलेले प्राजित परदेशी यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालवनच्या दांडी बीचच्या समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ समुद्राच्या मध्यभागी जाऊन तीन बोटीच्या मदतीने अंदाजे 400 फुट लांब नीसर्ग पुरक खान्याचे कलर व मत्स्य खाद्य वापरुन भारताचा तिरंगा बनवूण अनोखी सलामी दिली.

यापूर्वीही प्राजित परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी 321 फुटाची भव्य तिरंगा रॅली लोणंदमध्ये काढली होती. मागील वर्षी सिंहगडावर 350 फूट भगवी रॅली काढून तानाजी मालुसरे यांना आदरांजली वाहण्यात आली होती तर तीन महीन्यापूर्वी
कळसुबाई शिखरावर तिरंगा ध्वजच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा काढण्यात आला होता. मागील महिन्यात मालवण समुद्रामध्ये मागील याच महिन्यांमध्ये 321 फूट तिरंगा फडकविला होता.

प्राजित परदेशी यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी अॅडव्हेचर फोटोग्राफर मेहुल ढवळे, वन रकक्ष विश्वास मीसाळ, राहुल परदेशी व मालवन येथील अन्वय अंडरवॉटर सर्विसेसचे रूपेश प्रभू, अन्वय प्रभू, सुमंत लोणे, राजू परब, रश्मीन रोगे, नारायण रोगे यांचे सहकार्य लाभले. त्यांनी
तीन बोटी द्वारे सुमारे तीन किलोमिटर आत समुद्रामध्ये गेल्यानंतर मालवण येथील दांडी बीच समुद्रामध्ये सुमारे 400 फुट लांब तिरंगा नीसर्ग पुरक खान्याचे कलर व मत्स्य खाद्य वापरुन भारताचा तिरंगा साकारला. भारतीय प्रजासत्ताक दीनानीमीत्त एक आगळी वेगळी सलामी देन्यात आली. ज्या पध्दतीने वायुसेनेचे जवान हवेत वीमानाच्या मदतीमे धुर सोडुन हवेत तीरंगा निर्माण करून सलामी देतात याच पध्दतीची सलामी या अवलियांनी समुद्रातील पाण्यामध्ये दिली.
कोणत्याही देशाचा 400 फुट लांब एवढा मोठा तीरंगा पाण्यामध्ये तयार करण्याची बहुदा पहिलीच वेळ असावी. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने मालवणचा समुद्रकिणारा दुमदुमुन गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page