जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत टोपीवाला मालवण संघाने पटकाविले विजेतेपद..

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत टोपीवाला मालवण संघाने पटकाविले विजेतेपद..

सिंधुदुर्गनगरी संघास उपविजेतेपद.;भालचंद्र गावकरची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड..

मालवण /-

सिंधुदुर्गात प्रथमच ओरोस येथे रामा स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित ३ ऑन ३ बास्केटबॉल स्पर्धेत मालवणच्या टोपीवाला ए संघाने सिंधुदुर्गनगरी बी संघाचा पराभव करत विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेचे उदघाटन मैदान सेवक मंगेश माने यांच्या हस्ते करण्यात आले. यात टोपीवाला मालवणचे चार व सिंधुदुर्गनगरीचे चार असे आठ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात टोपीवाला ए संघाने टोपीवाला बी संघाचा पराभव करत तर सिंधुदुर्गनगरी बी संघाने सिंधुदुर्गनगरी ए संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात टोपीवाला ए संघाने सिंधुदुर्गनगरी बी संघाचा पराभव करत विजेतेपद पटकाविले.
सामन्यात टोपीवाला संघाच्या भालचंद्र गावकर, कमलेश मयेकर, गौरव लाड, रुजाय फर्नांडिस यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून भालचंद्र गावकर याची निवड करण्यात आली. विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी अमर गायकवाड, वीणा सोनी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..