कुडाळ भंगसाळ नदीला बंधारा बांधून पाण्याचा प्रश्न सोडविल्या बद्दल शहराच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा नागरी सत्कार..

कुडाळ भंगसाळ नदीला बंधारा बांधून पाण्याचा प्रश्न सोडविल्या बद्दल शहराच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा नागरी सत्कार..

कुडाळ/-

कुडाळ, भंगसाळ नदीला बंधारा बांधून कुडाळ शहराचा कायमचा पाण्याचा प्रश्न सोडविल्या बद्दल कुडाळ शहराच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, शिवसेना युवा नेते संदेश पारकर, काका कुडाळकर, ऍड. राजीव बिले, जि. प. सदस्य अमरसेन सावंत,. प. स. उपसभापती जयभारत पालव, शिवसेन शहराध्यक्ष संतोष शिरसाट, पावशी सरपंच बाळा गावकर, सुनील भोगटे, माजी जि. प. सदस्य विकास कुडाळकर आदी उपस्थित होते.

यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार वैभव नाईक म्हणाले, या सत्काराबद्दल मी आभारी आहे. यापुढे मी अधिक जोमाने काम करणार. एम आयडीसीतील ७०% कारखाने सुरु आहेत. उर्वरित ३०% जागा शासन ताब्यात घेऊन गरजू उद्योजकांना देईल. शहाराचे शहरीकरण वाढत आहे. त्यामुळे गरजा वाढत आहेत. औद्योगिक व व्यापार वाढत आहेत. एमआयडीसीने बांधलेला बंधारा हा आहे. त्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी ७.५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या नदीचे एकही थेंब पाणी कुठेही वळते करणार नाही. फक्त येत्या एप्रिल व मे महिन्यात हे पाणी चिपी विमानतळाला दिले जाणार आहे. या विमानतळासाठी परुळे येथून व्यवस्था होईल. लवकरच हे काम
७.५० कोटीचे गार्डन सुरु करणार.मच्छींद्रनाथ कांबळी नाट्यगृह कोकणातील आदर्श नाट्यगृह होईल.

यावेळी संदेश पारकर, काका कुडाळकर व ऍड. राजीव बिले मनोगते व्यक्त केली.यावेळी बिले यांनी हे पाणी कुडाळवासियांचे हक्काचे आहे. ते कुणाला देछ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आमदार नाईक यांचा कुडाळवासियांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. प्रत्येक वाडीतर्फे सत्कार करण्यात आला.

अभिप्राय द्या..