आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शौर्य मांजरेकरचा भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने सत्कार

आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शौर्य मांजरेकरचा भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने सत्कार

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले शहरातील गाडीअड्डा येथील कु.शौर्य शंकर मांजरेकर याला बेटी फाऊंडेशनच्या वतीने सन २०२० – २१ चा द ब्रीलीयंट चाईल्ड ऑफ इंडिया हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून वेंगुर्ले तालुक्याचे नाव रोशन केल्याबद्दल भाजपा व युवा मोर्चा , वेंगुर्लेच्या वतीने घरी जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर ,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर,युवा मोर्चा ता.सरचिटणीस नारायण कुंभार ,मनोहर तांडेल, उमेश कुंभार , भानुदास मांजरेकर, विश्व हिंदु परिषदेचे आशिष पाडगावकर व शंकर मांजरेकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..