शिवसेनेचेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कुडाळ पंचायत समिती सभागृहात साजरी..

शिवसेनेचेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कुडाळ पंचायत समिती सभागृहात साजरी..

कुडाळ /-

थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनेचे संस्थापक हिंदूह्रुदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कुडाळ पंचायत समिती सभागृहात शिवसेनेच्या वतीने साजरी करण्यात आली. तत्पूर्वी भाजपच्या वतीने हि जयंती साजरी करण्यात आली. शिवसेनेने साजरी केलेल्या कार्यक्रमात आमदार वैभव नाईक व जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते दोन्ही प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी कुडाळ पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव, पंचायत समिती सदस्य श्रेया परब, मथुरा राऊळ, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, माजी प. स. सदस्य गंगाराम सडवेलकर, व पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..