वेंगुर्ला / –
वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान-वेंगुर्ला व श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने सलग नवव्या वर्षी २३ ते २६ जानेवारी या कालावधीत श्री रामेश्वर मंदिर येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या कीर्तन महोत्सवात पुणे येथील प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त बुवा आफळे हे २३ रोजी ‘पाशुपतअस्त्र दान‘, दि.२४ रोजी ‘राजसूय यज्ञ‘, दि.२५ रोजी ‘संत नामदेव महाराज‘, दि.२६ रोजी ‘अफजलखान वध‘ यावर कीर्तने सादर करणार आहेत. या कीर्तनांना प्रसाद मेस्त्री (तबला), अमित मेस्त्री (ऑर्गन), माधव ओगले (हार्मोनियम) व निलेश पेडणेकर (पखवाज) आदी संगीतसाथ करणार आहेत.तरी श्रोत्यांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.