तळकट ते कळणे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी पुन्हा एखदा उपोषण..

तळकट ते कळणे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी पुन्हा एखदा उपोषण..

तळकट ते कळणे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी पुन्हा एखदा उपोषण..

दोडामार्ग /-

मागील उपोषणावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.चव्हाण यांनी रस्ता डांबरीकरण करण्यात येणार असे लेखी पत्र दिले होते. मात्र रस्ता अदयापर्यत डांबरीकरण करण्यात आला नाही.त्यामुळे 26 जानेवारी रोजी तळकट येथे रस्त्यावरच उपोषण करण्यात येणार असे निवेदन पत्रकार शिरिष नाईक व विष्णू देसाई यांनी बांधकाम अभियंता यांना दिले आहे.
तळकट ते कळणे हा रस्ता पुर्णपणे वाहतुकिस खराब झाला आहे. वाहने चालविणे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. दोन वेळा रस्त्याचे भुमिपुजन करण्यात आले होते. मात्र हा रस्ता डांबरीकरण होणार असे पालकमंत्री व लोकप्रतिनिधी सागुन उपोषण मागे घ्या
असे सांगितले होते. याच रस्त्यासाठी मार्च मध्ये उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री.चव्हाण यांनी भेट देऊन चर्चा करुन रस्ता डांबरीकरण करण्यात येणार असे लेखी पत्र दिले होते. मात्र रस्ता अदयापर्यत डांबरीकरण करण्यात आला नाही .ठेकेदाराला पाठिशी घालण्यासाठी चक्क अधिकारी यांनी खोटे आश्वासन दिले.
ते लेखी पत्र नसुन ते खोटे आश्वासन ठरले.अशा अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी.अशी आमची मागणी आहे.26 जानेवारी रोजी तळकट येथे रस्त्यावरच उपोषण करण्यात येणार अशा इशारा ग्रामस्थाच्या वतीने नाईक यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..