समर्थ बागवे महाराज संस्थानचे उपक्रम अनुकरणीय! ; उधोजक डॉ दीपक परब..

समर्थ बागवे महाराज संस्थानचे उपक्रम अनुकरणीय! ; उधोजक डॉ दीपक परब..

मसुरे /-

येथील समर्थ बागवे महाराज संस्थानचे सर्व उपक्रम नियोजनात्मक व अनुकरणीय असतात. आपल्या अध्यात्मिक शक्तीची प्रचिती दत्तगुरु आणि समर्थ बागवे महाराज यांनी वेळोवेळी भक्तांना दिली आहे. येथील उपक्रमांना आपले नेहमीच सहकार्य लाभेल असे प्रतिपादन मसुरे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व उद्योजक डॉ दीपक परब यांनी येथे केले.
मसुरे देऊळवाडा दत्त मंदिर येथे उद्योजक डॉ. दीपक परब यांचा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मुंबई मनपा सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर,
रामकृष्ण बागवे, गणपत बागवे, बाळा मेस्त्री, सौ मनीषा बागवे, राजन परब, अनिल बागवे, प्रकाश बागवे, सुनील परब, प्रथमेश राणे, बाळा बागवे, राहुल बागवे, प्रसाद बागवे, बुवा गुंडू सावंत, बुवा विनोद चव्हाण, सागर बागवे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक महेश बागवे यांनी करताना समर्थ बागवे महाराज तसेच येथील दत्त मंदिर येथे होणारे कार्यक्रम याबद्दल माहिती दिली तर आभार श्रीकृष्ण बागवे यांनी मानले.

अभिप्राय द्या..