हडपीड येथील भक्त निवासाचे २८ जानेवारी रोजी उदघाटन..

हडपीड येथील भक्त निवासाचे २८ जानेवारी रोजी उदघाटन..

मसुरे /;

देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथील भक्त निवासाचे उद्धाटन २८ जानेवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता होणार आहे. मठामध्ये येणाऱ्या बाहेरगावातील स्वामीभक्तांची व पर्यटकांची राहण्याची उत्तम सोय होईल याची दक्षता घेऊन भक्तांच्या सोयीसाठी सदर भक्तनिवास श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून दिनांक १५ फेब्रुवारी पासून प्रत्यक्ष भक्तांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.
खोली बुकींग साठी व अधिक माहितीसाठी(९८६९०१४१२३/९८६९९६७०५५/८३५६८९७१०१) या नंबर वर संपर्क साधावा.सर्व स्वामी भक्तांनी उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई यांच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर राणे व सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..