बांदिवडेत ७ फेब्रुवारी रोजी “काळी मिरी”अभ्यास कार्यक्रम कोकण बिझनेस फोरमच्या वतीने आयोजन..

बांदिवडेत ७ फेब्रुवारी रोजी “काळी मिरी”अभ्यास कार्यक्रम कोकण बिझनेस फोरमच्या वतीने आयोजन..

मसुरे /-

मालवण तालुक्यातील बांदिवडे पालयेवाडी येथे काळीमिरी प्रत्यक्ष लागवड पहाणी व काढणी पश्चात्य तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तसेच आपल्या शंकांचे निरसन असा संपूर्ण एकदिवसीय अभ्यास दौरा कोकण बिझनेस फोरम च्या माध्यमातून ०७ फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे.
ज्याला जगभर विशेषता अमेरिका आणि युरोप येथे मागणी असते असे भविष्यातील कोकणातील महत्त्वपूर्ण ग्लोबल कृषी उत्पादन “काळीमिरी” या विषयाची संपूर्ण माहिती या अभ्यास दौऱ्या मध्ये काळीमिरी शेतीतील यशस्वी शेतकरी मिलिंद प्रभू व कृषी तज्ञ डॉक्टर जे.एल. पाटील हे देतील.
ज्यांना या प्रत्यक्ष अभ्यास दौरा मध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी (८८५०८०७२२७ / ९०८२७८१५५१) येथे संपर्क करण्याचे आवाहन कोकण बिझनेस फोरमचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..