आचरेकर कुटुंबाकडून ग्रंथ वाटप वैजयंती आचरेकर स्मृती दिनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अनोखा उपाय..

आचरेकर कुटुंबाकडून ग्रंथ वाटप वैजयंती आचरेकर स्मृती दिनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अनोखा उपाय..

आचरा/-

सौ.वैजयंती लक्ष्मण आचरेकर यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून लक्ष्मण भिवा आचरेकर यांच्या आचरा बौद्धवाडी येथील राहत्या घरी त्यांच्या स्नुषा कवयित्री अनुराधा आचरेकर यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथांचे महिलांना वाटप केले.त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाचन संस्कृती वाढवावी , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात पसरावेत या उद्देशाने आपल्या सासूबाई सौ वैजयंती लक्ष्मण आचरेकर यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून त्यांच्या स्नुषा सौ अनुराधा आचरेकर यांनी पुष्पगंधविधी(हळदीकुंकू)समारंभ आयोजित केला होता. .या समारंभात सौ.अनुराधाअनिरुद्ध आचरेकर यांनी को. म. सा. प.शाखा मालवण अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांचा वाचनवृध्दीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या कुटुंबाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या “बुध्द आणि त्याचा धम्म” या ग्रंथाचे उपस्थिती महिलांना वाटप केले.या कौटुंबिक सोहळ्याला त्यांचे सासरे लक्ष्मण आचरेकर, अनिरुद्ध आचरेकर यांच्या सह आचरा बौद्धवाडीतील समस्त वाचनप्रेमी महिलावर्ग उपस्थित होता.

अभिप्राय द्या..