कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथील ग्रामस्थांचे बीएसएनएल टॉवर कार्यान्वित करण्यासाठीचे २६ जानेवारी रोजीचे उपोषण ठोस आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे.गेली तीन वर्षे महादेवाचे केरवडे येथील रखडलेला बीएसएनएल टॉवर कार्यान्वित करण्यासाठी ग्रामस्थांनी २६ जानेवारी २०२१ रोजी उपोषण करण्याचा पवित्रा घेतला होता. त्याची दखल घेत आज मंगळवार दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी बीएसएनएल सिंधुदुर्ग चे उप महाप्रबंधक श्री देशमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन टॉवर उभारणीचे काम ३१ मार्च २०२१ पूर्वी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. हे आश्वासन उपोषणकर्त्यांनी मान्य करून दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजीचे आंदोलन मागे घेण्यात आले.