कुडाळ तालुक्यातील पाटचा हेमंत देसाई च्या व्यंगचित्रांचा पुणे येथील व्यंगचित्र प्रदर्शनात सहभाग

कुडाळ तालुक्यातील पाटचा हेमंत देसाई च्या व्यंगचित्रांचा पुणे येथील व्यंगचित्र प्रदर्शनात सहभाग

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील पाटचा हेमंत देसाई च्या व्यंगचित्रांचा पुणे येथील व्यंगचित्र प्रदर्शनात सहभाग गतकालीन घटना-प्रसंग यात दडलेल्या विसंगत स्वरूपाच्या अर्थाचा हास्य जनक मार्मिक आविष्कार करणारे चित्र म्हणजे व्यंगचित्र,व्यंगचित्र हे सभोवतालच्या जीवनातील घडामोडी तील विसंगती नेमके टिपून त्यावर भाष्य करते.मानवाकृती तील नेमकी ठळक गोष्ट चित्रात नमूद करून त्यांचे दर्शन व्यंगचित्र घडवते.आज हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच व्यंगचित्रकार आहेत.व्यंगचित्रांमध्ये आदराने नाव घेतले जाते ते बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्या स्मृतीला वंदन करण्याकरिता आमचेही फटकारे या चित्रप्रदर्शन बालगंधर्व कलादालन पुणे येथे 20जानेवारी रोजी आयोजित केले आहे.यामध्ये चित्र व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिक व निमंत्रित व्यंगचित्रकारांसोबत चर्चा व मार्गदर्शन असा हा कला प्रदर्शनाचा हेतू आहे.देशातील निवडक व्यंगचित्रकारांचे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात येणार आहे.

यामध्ये आपल्या कुडाळ मधील पाट येथील श्री हेमंत देसाई यांच्या चित्रांची निवड झाली आहे.हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे प्रत्येक हिंदू व्यक्तींच्या धमन्यातून रक्ता सोबत वाहणारे नाव.स्वर्गीय बाळासाहेबांना मानवंदना देण्यासाठी पाट हायस्कूलचा हेमंत देसाई यांनी काढलेले ही छान छान व्यंगचित्र..

अभिप्राय द्या..