सिंधुदुर्गनगरी येथे ३२ रस्ता सुरक्षा महामार्ग कार्यक्रमाचे दिमाखात उद्घाटन संपन्न…

सिंधुदुर्गनगरी येथे ३२ रस्ता सुरक्षा महामार्ग कार्यक्रमाचे दिमाखात उद्घाटन संपन्न…

३२ रस्ता सुरक्षा महामार्ग कार्यक्रम आजपासून १७ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार संपन्न..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्गनगरी येथे ३२ वा रस्ता सुरक्षा महामार्ग कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमात कसाल- कणकवली केंद्र प्रभारी अधिकारी अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज, केंद्र कणकवली, कसाल येथे मा.अपर पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय, वाहतूक मुंबई , महामार्गाचे रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड तसेच परिक्षेत्राचे पोलीस उपअधीक्षक संदीप बागडीकर तसेच पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांचे मार्गदर्शनाखाली आमदार वैभव नाईक मालवण- कुडाळ मतदारसंघ यांचे हस्ते ३२ वा रस्ता सुरक्षा महामार्ग कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

३२ वा रस्ता सुरक्षा महामार्ग कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक नागरिक, वाहन चालक यांना सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.

सदर कार्यक्रमास उद्घाटक आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत हरिभाऊ चव्हाण, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जावेद शिखलकर, नाहस शाखा सिंधुदुर्ग सपोनी संजय डौर, रोटरी क्लब ऑफ कणकवली अध्यक्ष लहू पिळणकर, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, ट्रक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष गिरीराव रावराणे, प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज कसाल विजय कुमार कुसगावकर व म.पो.केंद्र कसालकडील पोलीस अंमलदार, स्थानिक नागरिक व विद्यार्थी आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.

अभिप्राय द्या..