पालकमंत्री, खासदार यांच्या टीकेला मिळालं जनतेकडून प्रत्युत्तर..
ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळालं भाजपला यश..
सिंधुदुर्ग /-
जिल्ह्यात कालच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचा निकाल हाती लागला असून सर्व तालुक्यात भारतीय जनता पार्टीला सुयश मिळालं आहे. जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायत मध्ये सुमारे 45 ग्रामपंचायत ती ह्या भाजप च्या ताब्यात आल्या आहेत,,जिल्ह्यातील आमदार, खासदार, पालकमंत्री यांना जनतेनेच चोख प्रत्युत्तर दिले आहे अशी बोचरी टीका यावेळी कणकवलीचे दार नितेश राणे यांनी केली आहे. येणाऱ्या सरपंच निवडी पर्यंत अजून काही ग्रामपंचायती ह्या भाजप च्या गोटात येतील असे आमदार नितेश राणे कुडाळ येथे आज मीडियाशी बोलताना स्पष्ठ केले आहे.