पिंगुळी येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश..

पिंगुळी येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश..

प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचा पक्षात यथोचित सन्मान केला जाईल.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत..

कुडाळ /-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय धोरणामुळे प्रभावित होऊन व महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची ज्या पद्धतीने संघटनात्मक ताकद वाढविण्याचे काम पक्षाचे सर्वेसर्वा मा.खासदार पवार व त्यांची टिम करत आहे.मा.श्री. शरद पवा साहेब यांच्या कोकणावर असलेल्या प्रेमाचा विचार करून व जिल्हाध्यक्ष अमित सामंत व अन्य पदाधिकारी यांच्या कार्यप्रणाली मुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष श्री.सुनील भोगटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज प्रवेश केला. आप्ले योग्य मान सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मिळेल यादृढ विश्वासाने आज प्रशांत पाताडे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेचा झेंडा हातात घेत आहोत.यापुढे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना वाढीसाठी जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत व अन्य पदाधिकारी यांच्या सोबत एकसंघ पणे माझ्या बरोबर प्रवेशकर्ते कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करून घर तिथे राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह पोहचविणार असल्याचे दिपक पिंगुळकर यांनी प्रवेशावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्ह्य़ात अन्य पक्षातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी होत आहेत त्यानुसार आज पिंगुळी येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह असलेल्या झेंड्याचा स्विकार करून पक्षात प्रवेश केला त्यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे.प्रवेशकर्त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेत योग्य मान सन्मान दिला जाईल.असे सांगून यावेळी उपस्थित प्रशांत पाताडे यांचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी बाळ कनयाळकर. शिवाजी घोगळे. भास्कर परब. सुनिल भोगटे.नझीर शेख.अनंत पिळणकर.रूपेश जाधव प्रतीक सावंत.सचिन तेंडुलकर.साबा पाटकर.उत्तम सराफदार. सर्फराज नाईक. इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

संदिप गोपाळ पिंगुळकर. दिपक गोपाळ पिंगुळकर. अशोक झिलू पिंगुळकर. रमेश झिलू पिंगुळकर. सुप्रिया अशोक पिंगुळकर.दिपाली दिपक पिंगुळकर.विष्णू रमेश चव्हाण. सौ.रक्ष्मी सहदेव पिंगुळकर. गोपाळ आत्माराम पिंगुळकर. सरिता सहदेव पिंगुळकर. संपदा अशोक पिंगुळकर. दीप्ती दिपक पिंगुळकर.दिव्या अशोक पिंगुळकर. लवू सखाराम पिंगुळकर. श्याम झिलू गोडे इत्यादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अभिप्राय द्या..