महाराणा प्रताप कला दालन हे वैभववाडी शहरातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ.;सतीश सावंत

महाराणा प्रताप कला दालन हे वैभववाडी शहरातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ.;सतीश सावंत

वैभववाडी/-

महाराणा प्रताप कला दालन हे वैभववाडी शहरातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे.महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास निधी मधून वैभववाडी येथे हे कलादालन दीड वर्षा पूर्वी बांधलेले आहे.कलादालनाचे काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे केले आहे.पावसाळ्यात या कलादालणाची इमारतीला गळती लागली आहे.या इमारतीच्या डागडुजीसाठी पालकमंत्री उदय सामंत व खा.विनायक राऊत यांच्या सहकार्याने निधी देण्यात येणार असल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.
वैभववाडी येथील कलादालनाची पाहणी सोमवारी संध्याकाळी केली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके,जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील,प्रदीप रावराणे,देवानंद पालांडे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
देशातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले वैभववाडी येथील महाराणा प्रताप कला दालन म्हणून ओळखले जात आहे.या कलादालनासाठी शासनाने 75 लाख रुपये इतका निधी खर्च केला आहे.मात्र दीड वर्षात या इमारतीची दुरवस्था झाली आहे.या गोष्टींचा खेद वाटतो.या कलादालनाचा उपयोग राजकीय हेतूने येथील लोकप्रतिनिधीनी करून घेतला आहे.तालुक्यातील व शहरातील जनतेला या कलादालणाचा उपयोग व्हावा म्हणून शासनाने लाखो रुपयेचा निधी दिला आहे.या ठिकाणी बाग बगीचा ,शोभिवंत फुलझाडे लावलेली होती मात्र सध्या महाराणा प्रताप कलादालन भकास दिसत आहे.या वाबत नगर पंचायतचे मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व शिवसेना पदाधिकारी यांच्या समक्ष पाहणी केली असता अनेक गोष्टींची उणीव असल्याचे निदर्शनास आल्या आहेत.तसेच महाराणा प्रताप यांचा पुतळा बसविलेल्या परिसराचा सुशोभीकरण करण्याचे सांगितले.
खा.विनायक राऊत ,पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने वाभवे – वैभववाडी नगर पंचायतीला ला कला दालनदुरुसाठी निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले.त्या दृष्टीने शासकीय अभियंता यांच्या कडून प्रस्ताव तयार करून घेण्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.
फोटो:वैभववाडी येथील महाराणा प्रताप कला दालन परिसराची पाहणी करतांना सतीश सावंत व वैभववाडी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी. छाया:(मोहन पडवळ)

अभिप्राय द्या..