मुंबई /-

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून प्राप्त सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 11 सप्टेंबर 2020 या दिवशी तुरळक ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाची व विजा चमकण्याची शक्यता असून, दिनांक 12 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर दिनांक 13 सप्टेंबर 2020 ते दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी. (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page