देवगड /-
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व मोफत आयुर्वेदिक औषधांचे वाटप हा कार्यक्रम देवगड येथील पोम्बुर्ले येथे करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मानसी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ,महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव समिती, वेदिक आयुर्क्योर हेल्थ अँड रिटेल प्रायव्हेट लिमिटेड व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव समितीचे कोकण विभागाचे प्रमुख एडवोकेट प्रसाद करंदीकर ,मानसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल जाधव, सौ संजना परांजपे, गावचे सरपंच सादिक डोंगरकर, शैलेंद्र पेडणेकर, देविदास परब, रौनक पटेल, किरण कदम, उपसरपंच काका फाळके, प्रियंका गावडे,अजित कुडाळकरउपस्थित होते.
कर्जदार जामीनदार हक्क बचाव समितीच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ यावेळी एडवोकेट प्रसाद करंदीकर यांच्या हस्ते फीत कापून झाला याच इमारतीमध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरासाठी आयुर्वेदाचार्य महेंद्र साळुंखे व आयुर्वेदाचार्य वैभव आहिर यांनी रुग्णांची तपासणी केली व त्यांना मोफत औषधे दिली पोंभुर्ले गावातील शेकडो नागरिकांना या औषधाचा लाभ मिळाला सुमारे दीड लाखाचे औषधे यावेळी गावात मोफत देण्यात आली उपस्थित असलेल्या सर्व तज्ञ मंडळींनी माणसाची रोजची जीवनशैली व आरोग्य याचे सविस्तर विवेचन केले नवीन आधुनिक जीवनशैलीमुळे बिघडलेले आरोग्य व ते सुधारण्यासाठी अमलात आणायची जीवनशैली यावरही भाष्य केले एडवोकेट प्रसाद करंदीकर यांनी यापुढेही अशाच प्रकारे आरोग्य शिबिराचे आयोजन व औषध पुरवठा सुरू राहणार आहे.अशा शब्दात सर्व ग्रामस्थांना आश्वासन दिले आहेत.