टीटीडीएस पर्यटन संस्थेमार्फत छेडण्यात येणाऱ्या वीज बिल पताका आंदोलनास व्यापारी संघ, मद्य विक्रेता संघाचा पाठिंबा..

टीटीडीएस पर्यटन संस्थेमार्फत छेडण्यात येणाऱ्या वीज बिल पताका आंदोलनास व्यापारी संघ, मद्य विक्रेता संघाचा पाठिंबा..

मालवण/-

कोरोना टाळेबंदीचा मोठा आर्थिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला असून कोरोना काळात वीज वितरणने पर्यटन व्यावसायिकांना दिलेल्या वाढीव वीज बिलात माफी मिळावी. तसेच टाळेबंदी नंतरच्या कालावधीत वीज बिलांमध्ये शासनाने ५० टक्के सूट द्यावी. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता येत्या १९ जानेवारी रोजी तारकर्ली पर्यटन विकास संस्थेने येथील वीज वितरण कंपनी कार्यालयात वीज बिल पताका आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

या आंदोलनास मालवण व्यापारी संघाने पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी दिली आहे तसेच सिंधुदुर्ग मद्य विक्रेता व्यापारी संघाचे अध्यक्ष शेखर गाड यांनी देखील पाठिंबा दिला आहे.

अभिप्राय द्या..