मालवण /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५वर्षांवरील टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी एकत्र येत प्रथम जिल्ह्यातील प्रत्येक
तालुक्यांच्या ४५ वर्षांवरील टेनिस
क्रिकेट खेळाडूंच्या स्वतंत्र असोसिएशनची स्थापना आणि जिल्ह्याची एक जिल्हा हौशी क्रिकेट
असोसिएशन स्थापना याच महिन्यात
करण्यात आली सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट मधील
गतकाळातील आठवणींना उजाळा
देणाऱ्या नवीन पर्वाची सुरुवात येथील
टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग ग्राउंड येथे या स्पर्धेच्या निमित्ताने झाली आहे.

अंतिम सामन्यात ३९ धावांचा पाठलाग करताना चौथ्या षटकात सलग तीन उत्तुंग षटकार खेचणारा मालवण संघाचा आशिष शेलटकर सामनावीर आणि मालिकावीर ठरला. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज देवानंद खवणेकर (सावंतवाडी), उत्कृष्ट गोलंदाज बाळा मडगावकर(सावंतवाडी) तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सिद्धेश कांबळी(मालवण) यांची निवड झाली.

स्पर्धेमध्ये ७ संघांनी सहभाग घेतला. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात कुडाळ संघाला पराभूत करून सावंतवाडी संघ तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मालवण संघाने कणकवली संघाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सावंतवाडी संघाने अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३९ धावा केल्या.

४० धावांचा पाठलाग करताना संघासमोर कठीण परिस्थिती असताना मालवणच्या आशिष शेलटकर याने सलग ३ षटकार ठोकून चार चेंडू शिल्लक ठेवत विजयश्री खेचून आणली. अंतिम सामन्यात सावंतवाडीच्या बाळा मडगावकर याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करीत ३ बळी मिळविले.

विजेत्या आणि उपविजेत्या संघाना जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने फिरता चषक तसेच क्रिकेटपटू कै. आशिष शिंदे यांच्या स्मरणार्थ ‘ऑप्टिमम फिटनेस सेंटर’,च्या वतीने दोन्ही संघांना विजेता आणि उपविजेता कायमस्वरूपी चषक नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा हौशी क्रिकेट असो. अध्यक्ष अनिल हळदिवे आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील खेळाडूंची प्रत्येक वर्षी प्रत्येक तालुक्यात एक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पहिल्या वर्षी स्पर्धा आयोजनाचा मान मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनला मिळाला. मालवण एज्युकेशन सोसायटीज हायस्कुलच्या बोर्डिंग ग्राऊंड येथे रविवारी आयोजित ही स्पर्धा जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटू, मान्यवर आणि क्रिकेट प्रेमींच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ क्रिकेटपटू देवदत्त हडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. मालवणच्या क्रीडाक्षेत्रात मोठे योगदान असलेले क्रिकेटपटू तथा माजी नगराध्यक्ष कै. लीलाधर हडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

खेळासाठी योगदान देणाऱ्या मालवणसह जिल्ह्यातील विभूतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवदत्त हडकर, शिवाजी म्हापणकर, बबन रेडकर, रुजाय उर्फ बाबला फर्नांडिस, महादेव पाटकर, रंजन कांबळी, नितीन वाळके, जॉन नरोन्हा, दीपक मयेकर, बाबू वायंगणकर, दादू रेवंडकर, हनुमंत पाटकर, बाबला डिसोझा, शंकर पराडकर, विजय गावकर यांचा जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सत्कार आणि सन्मान चिन्ह देण्यात आली. यावेळी कु. शुभांगी घाडी(हिंदळे), यश घाडी(शिरगाव) या उदयोन्मुख क्रिकेटपटूंचा राज्यस्तरावर चमकदार कामगिरी केल्याबद्दल ‘मालवण स्पोर्ट्स असोसिएशन’च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. महेश कांदळगावकर, नितीन वाळके, अनिल हळदिवे, बाबला पिंटो यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल हळदीवे, उपाध्यक्ष काका कुडाळकर आणि विजय जोईल, सचिव बाबली वायंगणकर, सहसचिव सुशील शेडगे, खजिनदार बबन परब, पप्पू परब, तर सहखजिनदार शरद शिरोडकर, राजन नाईक, आनंद आळवे, सुरेल परब, उमेश मांजरेकर, सुनील धुरी, दिलीप वर्णे, रिझवान शेख, नाना कुडाळकर, अभय नाईक, सुधीर साटम, उदय रुमडे, सुधीर सारंग, अजय मोर्ये, रशीद शेख, राजू गवंडे, संजय फर्नांडिस तसेच जॉन नरोन्हा, परशुराम पाटकर, भाऊ हडकर, उमेश नेरुरकर, बाबला पिंटो, नितीन वाळके, सुनील शिंदे, झहीर शेख, उत्तम नेमळेकर, शंकर पराडकर, नंदन देसाई, हेमंत कोचरेकर, श्याम वाक्कर, विक्रम मोरे, नंदकिशोर गावडे, बाळ पेडणेकर, विद्याधर वरसकर, चंद्रकांत मेस्त्री आदी उपस्थित होते.

धावते समालोचन श्याम वाक्कर, प्रदीप देऊलकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अजय शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page