सर्व ७ पैकी ७ सदस्य विजयी..

कुडाळ /-

कुडाळ तालुकयातील गिरगाव-कुसगाव व वसोली या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे सर्व ७ पैकी ७ सदस्य निवडून आले आहेत.खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी विरोधकांना क्लीन स्वीप दिली आहे.

गिरगाव-कुसगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जि. प गटनेते नागेंद्र परब, उपविभाग प्रमुख नरेंद्र राणे यांच्या यशस्वी रणनीतीमुळे प्रभाग १ मधून भरत घाडी, स्नेहा सावंत, सुरेखा घाडी , प्रभाग २ मधून प्रगती चव्हाटेकर, संतोष सावंत, प्रभाग ३ मधून शशिकांत आचरेकर, प्रतिभा गुरव हे शिवसेना उमेदवार विजयी झाले आहेत.
तर वसोली ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समिती सद्स्या श्रेया परब, सुधीर राऊळ यांच्या यशस्वी रणनीती मुळे शिवसेनेचे सर्व ७ पैकी ७ सदस्य निवडून आले आहेत. २० वर्षे राणे समर्थकांची सत्ता असलेली हि वसोली ग्रामपंचायत शिवसेनेने यावेळी खेचून आणली आहे. प्रभाग १ मधून निवास कारीवडेकर, मीनाक्षी राऊळ,प्रभाग २ मधून सदानंद गवस, प्रियांका परब, सुरेखा डांगी, प्रभाग ३ मधून अजित परब व दीक्षा तवटे हे शिवसेना उमेदवार विजयी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page