एका ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व…
मालवण /-
मालवणातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद वर्चस्व राखत शिवसेनेचा धुव्वा उडविला. शिवसेनेला केवळ एकाच ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखता आले.
सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज येथील तहसील कार्यालयात तहसीलदार अजय पाटणे, सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत झाली. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी सकाळपासूनच तहसील कार्यालय परिसरात गर्दी केली होती. तहसील कार्यालयात केवळ उमेदवार आणि प्रतिनिधी यांना प्रवेश देण्यात येत होता. अन्य ग्रामस्थांना पोलिस वसाहतीच्या परिसरात थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरवात करण्यात आली. मतमोजणीसाठी सहा टेबल लावण्यात आली होती.
आडवली-मालडी ग्रामपंचायतीसाठी प्रभाग एकमधून सुनील जाधव (१७१ मते), सोनाली पराडकर (१७६ मते), भक्ती साटम (१४५ मते) मिळवून विजयी झाले तर अक्षय कदम, अमृता चव्हाण, सायली यादव यांचा पराभव झाला. प्रभाग दोन मध्ये संदीप आडवलकर (१२५ मते), दामिनी घाडीगावकर (१२४ मते) मिळवून विजयी झाले तर नारायण पांचाळ, सीमा घाडीगावकर यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक तीनमधून ज्योती लाड, स्वप्नील लाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कुणकवळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमधून शुभांगी मेस्त्री, श्रेया दळवी यांचीबबिनविरोध निवड झाली आहे. सुरेश राणे (११० मते) मिळवून विजयी झाले तर प्रफुल्ल पवार यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक दोनमध्ये कार्तिकी निकम (५० मते), जयवंत तेली (५५ मते) मिळवून विजयी झाले तर नयना देसाई, चंद्रकांत पोळ यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक तीनमध्ये मंदार वराडकर (७१ मते), देवयानी कदम (७५ मते) मिळवून विजयी झाले तर सागर चुडनाईक, नेत्रा कुणकवळेकर यांचा पराभव झाला. खरारे पेंडूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये अश्विनी पेडणेकर (३०६ मते), नितीन राऊळ (१३५ मते), सुनीता मोरजकर (२१७ मते) मिळवून विजयी झाले तर नीलम हिंदळेकर, शैलेश परब, विनोद सावंत, अमिता नाईक, योगीता पेंडूरकर यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक दोनमध्ये कृष्णा मांडकुलकर (२४९ मते), समृद्धी सरमळकर (३०४ मते), नेहा परब (३३० मते) मिळवून विजयी झाले तर मयुरेश पेंडूरकर, मनीषा हिंदळेकर, प्रणाली सावंत यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक तीनमध्ये सुमित सावंत (१९१ मते), अंकिता सावंत (२११ मते) मिळवून विजयी झाले तर स्वप्नील आपटे, ज्योती सावंत यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक चारमध्ये विवेक जबडे (२७७ मते), संदीप सावंत (२९२ मते), वैष्णवी लाड (३७१ मते) मिळवून विजयी झाले तर राजेंद्र पाटकर, संजय पाटकर, साबाजी सावंत, प्रणाली सावंत यांचा पराभव झाला.
गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायतीतून प्रभाग क्रमांक एकमध्ये शरद मांजरेकर (२९० मते), एकादशी गावडे (३१७ मते), सुभाष लाड (२३८ मते) मिळवून विजयी झाले. वासुदेव पावसकर, शारदा मुणगेकर, संजय पाताडे, प्रशांत परब यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक दोनमध्ये प्राजक्ता चिरमुले (२६३), मेघा गावडे (२३२ मते), साबाजी गावडे (२२७ मते) मिळवून विजयी झाले तर प्राजक्ता परब, सरिता चिरमुले, भाऊ चव्हाण, मनीष जाधव यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक तीनमध्ये विरेश पवार (२३९ मते), शिल्पा तेली (२२३ मते), विभा परब (२६३ मते) मिळवून विजयी झाले तर प्रशांत डिकवलकर, प्रज्ञा चव्हाण, नावीन्या गावडे यांचा पराभव झाला.
चिंदर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये केदार परुळेकर (३१५ मते), रिया घागरे (२७८ मते), दीपक सुर्वे (३०४ मते) मिळवून विजयी झाले तर सागर परुळेकर, रोहिणी घागरे, सतीश हडकर यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक दोनमध्ये राजश्री कोदे (२८० मते), सानिका चिंदरकर (२३९ मते), शशिकांत नाटेकर (२१५ मते) मिळवून विजयी झाले तर जयवंती पाटणकर, उर्मिला मालवणकर, विश्वनाथ दळवी यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक तीनमध्ये दुर्वा पडवळ (२०७ मते), महेंद्र मांजरेकर (१८४ मते) मिळवून विजयी झाले तर ममता पांचाळ, सचिन चिंदरकर यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक चारमध्ये नम्रता महांकाळ (२९९ मते), जान्हवी घाडी (२८४ मते), निलेश रेवडेकर (२३९ मते) मिळवून विजयी झाले. वेदा लब्दे, प्रिया पालकर, भूषण पाताडे यांचा पराभव झाला.
मसदे-चुनवरे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये ऋतुजा नार्वेकर (१२९ मते) केतकी प्रभू (१४५ मते), अंकुश नेरुरकर (१५१ मते) मिळवून विजयी झाले तर किरण कांदळकर, सुचिका सावंत, दत्तराम आंबेरकर यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक दोनमध्ये धनश्री कांदळकर (१७३ मते), शमिका वाडकर (१७९ मते), कलाधर कुशे (१६३ मते) मिळवून विजयी झाले तर रेश्मा नेरुरकर, भाग्यश्री सावंत, अमित कुशे यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनिल जाधव (१५९ मते), रामदास पांजरी (१४५ मते), श्रेया परब (१४६ मते) मिळवून विजयी झाले तर गुलाब जाधव, रुपेश वर्दम, वैशाली परब यांचा पराभव झाला.