वैभववाडीत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व..

वैभववाडीत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व..

१३ पैकी ९ ग्रा.पं. भाजपाकडे, ४ सेनेकडे..

वैभववाडी:/-

वैभववाडी तालुक्यात ग्रा.पं. निवडणुकीत भाजपाचाच वरचष्मा राहिला आहे. १३ ग्रा पं पैकी ९ ग्रा.पं. चे निकाल भाजपाच्या बाजूने तर ४ सेनेच्या बाजूने लागले आहेत.तालुक्यातील सांगूळवाडी, आचिर्णे, मांगवली, वेंगसर, एडगाव, नाधवडे, कोकिसरे, ऐणारी, भुईबावडा ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता आली आहे. तर लोरे , खांबाळे, कुंभवडे , सोनाळी ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तालुक्यात एकंदरीत भाजपाने शिवसेनचा पराभव केला आहे.

अभिप्राय द्या..