वैभववाडी/-
वैभववाडी शहरामध्ये आठवडा भरात दुसऱ्यांदा कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.रविवारी रात्री सुंदराबाई निकम,दीपक गजोबार,संजय निकम यांच्यासह अनेक महिलांनी खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.यावेळी खा.विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत,जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना नेते अतुल रावराणे,संदेश पारकर,उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे,तालुका अध्यक्ष मंगेश लोके,जि. प.सदस्य संजय आग्रे,संदेश सावंत- पटेल,माजी सभापतीरमेश तावडे,लक्ष्मण रावराणे,बँक संचालक दिगंबर पाटील,अशोक रावराणे,शहर प्रमुख प्रदीप रावराणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
खा.विनायक राऊत म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य महिला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करत आहेत.वैभववाडी शहरातील अनेक महिला शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षा आलेल्या आहेत.सर्व महिला भगिनींना पक्षात सन्मान केला जाईल.महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.पालकमंत्री उदय सामंत म्हणाले,येत्या आठ दिवसात वैभववाडी येथील महाराणा प्रताप कला दालनाची पाहणी करणार आहे.कलादालन सुशोभीकरण करण्यासाठी निधी देणार आहे.तसेच वैभववाडी शहरातील प्रलंबित विकास कामांसाठी एक कोटींचा निधी दिला जाणार आहे असे आश्वासन दिले.
यावेळी सतीश सावंत,अतुल रावराणे,संदेश पारकर यांनी मनोगत व्यक्त केले.