पोलीस आणि पत्रकारांच्या तत्परतेने आग आटोक्यात

पोलीस आणि पत्रकारांच्या तत्परतेने आग आटोक्यात

मोहोरलेली कलम बागायती आगीपासून वाचल्या

आचरा-

आचरा मालवण रस्त्यावर भगवंत गड फाट्या नजिक आग लागल्याची खबर व्यापारी संघटनेचे खजिनदार जयप्रकाश परूळेकर यांनी पत्रकार आणि वाहतूक पोलीस यांना देताच सर्वांनी धाव घेत कुणाची वाट न बघताच आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.त्यांच्या तत्परतेमुळे आग मोठ्या प्रमाणात फैलावण्यास प्रतिबंध झाल्याने लगतच्या आंबा बागायतदारांच्या मोहोरलेल्या बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचल्या

रविवारी दुपारी दिड च्या सुमारास आचरा भगवंत गड फाट्या लगतच्या गवताला आग लागली होती.वारयामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. याची माहिती आचरा व्यापारी संघटनेचे खजिनदार जयप्रकाश परूळेकर यांनी पत्रकार अर्जुन बापर्डेकर,परेश सावंत, उदय बापर्डेकर,यासह वाहतूक पोलीस साटम, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण यांना देत त्यांच्या सह
तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित जागा मालकांची वाट न बघता आग विझविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.यावेळी आगीची खबर मिळाल्याने उपस्थित झालेले मुन्ना आचरेकर, चिरागआचरेकर यांनी ही आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले . त्यांच्या या प्रयत्नांमुळे आग विझविण्यात यश आल्यामुळे लगतच्या आंबा बागायतींचे नुकसान टळले.

अभिप्राय द्या..