कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी एकूण ३ फेरी व एकूण ९ टेबलांवर होणार आहे. यासाठी २७ कर्मचारी मतमोजणीचे काम करणार असून ही मतमोजणी कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे स १० वा सुरू होणार आहे.

कुडाळ तालुक्यातील कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी, कुपवडे , वाडोस, गोठोस, वसोली, पोखरण- कुसबे, आकेरी, गिरगाव- कुसगाव, गोवेरी या ग्रामपंचायतींसाठी १५ मार्च रोजी मतदान झाले. नऊ ग्रामपंचायतीच्या 73 जागांसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली होती. परंतु ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत त्यामुळे आता ६९ जागांची मतमोजणी होणार आहे. एकूण तीन फेरीत ही मतमोजणी होणार आहे. प्रत्येक फेरीत ९ टेबले असणार आहेत. या फेरीत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ ची अशा ९ प्रभागांची, दुसर्‍या फेरीत सर्व प्रभाग क्रमांक २ ची तर तिसर्‍या फेरीत प्रभाग क्रमांक तीनची मतमोजणी करण्यात येणार आहे. या प्रत्येक टेबलावर ३ कर्मचारी या प्रमाणे २७ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या नऊ ही ग्रामपंचायतीचा निकाल तासाभरातच जाहिर होण्याची शक्यता आहे.या निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मतमोजणी टेबल व उमेदवार यांच्यात सोशल डिस्टंसिंगचा नियमाचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page