कुडाळ सं|गीर्डेवाडीतील 25 ते 30 भाजप कार्यकर्त्यांचा पालकमंत्री, खासदार, आमदर, यांच्या उपस्थितीत शिवसेनेत..

कुडाळ सं|गीर्डेवाडीतील 25 ते 30 भाजप कार्यकर्त्यांचा पालकमंत्री, खासदार, आमदर, यांच्या उपस्थितीत शिवसेनेत..

कुडाळ/-

कुडाळ सं|गीर्डेवाडीतील 25 ते 30 रानेसमर्थक भाजप कार्यकर्त्यांचा आज पालकमंत्री उदय सामंत , खासदार विनायक राऊत ,आमदर वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.हा प्रवेश अमित राणे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत करण्यात आला.यावेळी पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत ,आमदार वैभव नाईक यांच्या निर्णयातून श्रीं.अमित विजय राणे यांची स|र्गिर्डे शिवसेना शाखा प्रमुख पदी नेमणूक करण्यात आली.तर, स|र्गिर्डे बूथ प्रमुख पदी श्री.विजय परब यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी अमित राणे यांच्यासोबत ,दशरथ वासुदेव राणे ,रवींद्र अर्जुन राणे ,प्रथमेश प्रदीप राणे ,माहेश राणे ,दीपक राणे ,वैभव परब ,अमित परब ,नंदकिशोर परब ,सुशांत परब ,समीर वालावलकर ,गौरेश ओसरगावकर ,रश्मी ओसरगावकर ,समीर बर्वे ,अम्येय परब ,प्रमोद राणे,साई पारकर ,
सुधीर परब ,तेजस्वी परब ,बाळकृष्ण परूळेकर या भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट यांच्या माध्यमातून सर्व भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी व्यासपीठावर खा. विनायक राऊत, कुडाळचे आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, मुंबई चे महपौर दत्ता दळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रसाद बांदेकर, विकास कुडाळकर,विजय प्रभू, शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक,मंदार शिरसाट, योगेश धुरी,अतुल बंगे,रुपेश पावसकर, नगरसेवक सचिन काळाप,नगरसेविका मेघा सुकी, आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना खा. राऊत म्हणाले, युवासेनेने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. ते केवळ सोशल मीडिया पुरते न राहता.आधार दिला पाहिजे. तर आमदार वैभव नाईक यांनी होऊ घातलेली विकासकामे लवकरच पूर्ण होतील. मंदार शिरसाट व युवासेनेने केलेले कार्य अभिमान वाटावा असे आहे.

अभिप्राय द्या..