युवासेनेच्या माध्यमातून कुडाळ मधील जिल्हापरिषद मतदारसंघात वडापाव गाड्यांचे वाटप..

युवासेनेच्या माध्यमातून कुडाळ मधील जिल्हापरिषद मतदारसंघात वडापाव गाड्यांचे वाटप..

बेरोजगारी नष्ट करण्यासाठी मंदार शिरसाट यांनी केलेले कार्य कौतुकास्पद पालकमंत्री उदय सामंत

कुडाळ/-

बेरोजगारी नष्ट करण्यासाठी मंदार शिरसाट यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. यापेक्षा उपयुक्त काम दुसरे असछ शकत नाही. हा उपक्रम अखंडपणे चालू राहील याची सर्वांनी दखल घ्या, असे आवहन पालकमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ येथे केले. कुडाळ येथे आज युवासेनेच्या माध्यमातून युवकांना रोजगारासाठी वडापाव गाड्यांचे वितरण पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर खा. विनायक राऊत, कुडाळचे आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, मुंबई चे महपौर दत्ता दळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रसाद बांदेकर, विकास कुडाळकर,विजय प्रभू, शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक,मंदार शिरसाट, योगेश धुरी,अतुल बंगे,रुपेश पावसकर, नगरसेवक सचिन काळाप,नगरसेविका मेघा सुकी, आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना खा. राऊत म्हणाले, युवासेनेने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. ते केवळ सोशल मीडिया पुरते न राहता.आधार दिला पाहिजे. तर आमदार वैभव नाईक यांनी होऊ घातलेली विकासकामे लवकरच पूर्ण होतील. मंदार शिरसाट व युवासेनेने केलेले कार्य अभिमान वाटावा असे आहे.यावेळी पालकमंत्री उदय सामंत व खा. राऊत यांच्या हस्ते वडापाव गाड्यांचे वितरण करण्यात आले. सर्व प्रथम कै. देवेंद्र संजय पडते व्यासपिठाचे पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

अभिप्राय द्या..